image-whatsapp
image-call

Facilities

शाळेचे शैक्षणिक, सामाजिक व सर्वांगीण विकास उपक्रम

शैक्षणिक प्रगती

  • विद्यार्थ्यांच्या बौद्धिक पातळी नुसार त्यांचे वर्ग ठरविले जातात.भाषा, गणित, व्यावसायिक प्रशिक्षण, स्वावलंबन, खेळ इ गोष्टी शिकवण्याकडे वैयक्तिक रित्या लक्ष निदेशक यांच्या कडून दिले जाते.
  • भाषा विषयामध्ये विद्यार्थ्यांना स्वःताची ओळख असावी या करीता निदेशक त्यांची तयारी करून घेतात.
  • गणित विषय मध्ये निदेशक विद्याथ्यांकडून अंकगणित तसेच व्यावहारिक ज्ञानासाठी नोटा व नाणी यांची ओळख करून देतात.

व्यावसायिक प्रशिक्षण

  • विद्यार्थ्यान कडून सोप्या स्तरावरील कामे, औद्योगिक कामे, बागबगीचा व शेती कामे, हस्तकला, घरगुती सेवा कौशल्य, इ प्रशिक्षण दिले जाते
  • वरील कौशल्य तसेच प्रशिक्षण आत्मसात करीत असताना विद्यार्थ्यांना विविध वस्तूची माहिती दिली जाते तसेच त्या वस्तू बाजार मध्ये कशा प्रकारे विकता येतील या साठी त्यांना बाजारपेठे मध्ये विक्री साठी पाठवले जाते व आर्थिक व्यवहार समजाविले जातात.

संवाद कौशल्य

  • विद्यार्थ्याना त्यांच्या मुलभूत गरजा व भावना स्पष्ठपणे व्यक्त करता याव्यात या साठी विद्यार्थ्यान कडून संवाद कौशल्यची तयारी करून घेतली जाते.
  • विद्यार्थ्यान कडून संवाद करून घेत असताना आत्मविश्वास वाढावा यासाठी प्रोस्ताहन दिले जाते.
  • संवाद करत असताना हावभाव यांचा वापर कसा व कोणत्या परिस्थिती करावा हे शिकवले जाते.

व्यक्तिमत्व विकास

  • विद्यार्थ्यामध्ये नेतृत्व गुण निर्माण होण्यासाठी त्यांना स्वावलंबनाचे शिक्षण दिले जाते.
  • स्वावलंबन (उदा. स्वतःची कामे स्वतः करणे, शिस्त पाळणे) स्वतःवर आत्मविश्वास, जबाबदारीची जान निर्माण विद्यार्थ्यान मध्ये झाली पाहिजे, याकडे विशेष लक्ष दिलेजाते.

सामाजिक समावेश

  • परस्परामध्ये मैत्रीचे नाते जोपासण्यास शिकविले जाते.
  • गटामध्ये काम करण्याची क्षमता निर्माण झालेली आहे.
  • सामाजिक नियम व संस्कार समजून घेण्याची तयारी करून घेतात

परीक्षा निकाल

  • सत्र १ व सत्र २ परीक्षांचा निकाल तसेच विद्याथ्यांच्या गुणांचे विश्लेषण यांची नोंद ठेवली जाते.

खेळ

  • विद्यार्थ्यांना त्यांच्या कलेनुसार खेळता येणारे खेळ शिकविले जातात.
  • जिल्हास्तरीय तसेच रज्य स्तरीय स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला आहे.

उपक्रम

  • शाळेमध्ये विविध उपक्रम आयोजी केले जातात त्या मध्ये सांस्कृतिक ,क्रीडा, व सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. त्या उपक्रम मध्ये सहभागी होणा-या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येते.

आमची वैशिष्ठे

  • उच्चशिक्षित,तज्ञ व अनुभवी अध्यापक वृंद
  • विध्यार्थी शिक्षक प्रमाण 13:1
  • प्रत्येक वर्गात जास्तीत जास्त 13 विध्यार्थी
  • योगासन व प्राणायम प्रशिक्षण
  • मुलांचा आवडी व रुचिनुसार विविध हस्त कलांचे प्रशिक्षण
  • स्वावलंबनाचे व व्यवसायपूर्ण कौशल्याचे प्रशिक्षण
  • मुलांमध्ये असलेल्या संस्कृतिक कला गुणांना वाव देवून विकास करणे
  • पारंपरिक व आधुनिक खेळांचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण
  • आपत्कालीन व्यवस्थापणाचे प्रशिक्षण
  • पूर्णवेळ कार्यरत समुपदेशक
  • पोषक व संतुलित आहार
  • अत्याधुनिक उपकरणाचे प्रशिक्षण
  • अध्यावत एक्टिविटी सेंटर
  • मुला-मुलींसाठी स्वतंत्र वस्तीगृह व संडास-बाथरूमची सोय
  • आंघोळीसाठी गरम पाणी
  • वाय-फाय कॅम्पस
  • ऑनलाइन सी.सी.टी.वी कॅमेरा व स्पीकर
  • मुलांच्या मानसिक आरोग्याची मनोसोपचार तज्ञ
  • मुलांच्या औषध उपचारांसाठी नर्स
  • मुलांची काळजी घेण्यासाठी काळजी वाहक