मतिमंद व्यक्तींना स्वावलंबी बनवणे त्यांच्या क्षमतांनुसार कौशल्य विकसित करून दैनंदिन जीवनात स्वतःचे काम स्वतः करण्यास सक्षम बनवणे. व्यावसायिक व आर्थिक सक्षमीकरण मेणबत्ती, अगरबत्ती, फाईल तयार करणे, शिवणकाम, बागकाम, पॅकिंग काम अशा व्यवसायिक कौशल्यांद्वारे रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे. सामाजिक समावेशन वाढवणे मतिमंद व्यक्तींना समाजात सन्मानाने व आत्मविश्वासाने समाविष्ट होण्यासाठी योग्य वातावरण व प्रशिक्षण देणे.शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकास शारीरिक व्यायाम, थेरपी, सल्लामसलत, मनोरंजनात्मक क्रिया यांद्वारे सर्वांगीण विकास साधणे.स्वच्छ, सुरक्षित व प्रोत्साहनात्मक कार्यपरिसर देणे शिकण्यासाठी, काम करण्यासाठी व व्यक्तिमत्त्व विकासासाठी सुरक्षित आणि सकारात्मक वातावरण उपलब्ध करणे. पालक–संस्था समन्वय वाढवणे पालकांना मार्गदर्शन करून मुलांच्या प्रगतीसाठी संयुक्तपणे प्रयत्न करणे.आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व विकास आत्मविश्वास वाढवणाऱ्या कृती, उपक्रम व प्रशिक्षणाद्वारे व्यक्तिमत्त्वाचा विकास घडवणे.
मतिमंद व्यक्तींना शिक्षण, प्रशिक्षण आणि संधी उपलब्ध करून देऊन त्यांना स्वावलंबी, आत्मविश्वासी आणि समाजात सन्मानाने जगणारे सक्षम नागरिक बनवणे हा कार्यशाळेचा दृष्टिकोन आहे. त्यांच्या विशेष क्षमतांना योग्य दिशादर्शन देऊन सर्वांगीण विकास, सामाजिक समावेशन आणि जीवनमान उंचावणे हाच कार्यशाळेचा दीर्घकालीन उद्देश आहे.